स्पर्धा परीक्षा प्रश्न आणि उत्तर
👉प्रश्न पहिला- महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
1) रश्मी शुक्ला
2) विवेक फणसाळकर
3) संजय वर्मा
4) विजय शर्मा
उत्तर :- संजय वर्मा
👉प्रश्न दुसरा - आंतरराष्ट्रीय कार्यक्षमता हब चे मुख्यालय कोठे आहे ?
1) पॅरिस
2) न्यूयॉर्क
3) काठमांडू
4) ढाका
उत्तर :- पॅरिस
👉प्रश्न तिसरा - पोलीस विभागातील के जी युनिट कशाशी संबंधित आहे?
1) कराटे
2) बिनतारी संदेश
3) श्वान
4) शस्त्रसाठा
उत्तर :- श्वान
👉प्रश्न चौथा- महाबळेश्वर जवळील भिलार हे गाव ..... म्हणून प्रसिद्ध आहे ?
1) वनस्पतीचे
2) पुस्तकाचे
3) फळांचे
4) मधाचे
उत्तर :- पुस्तकाचे
👉प्रश्न पाचवा -एसबीआयच्या लोकसंख्या अहवालानुसार युवकांच्या संख्येत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?
1) पहिल्या
2) दुसऱ्या
3) तिसऱ्या
4) चौथ्या
उत्तर :- चौथ्या
👉प्रश्न सहावा- न्यू मंगलोर हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?
1) केरळ
2) कर्नाटक
3) गोवा
4) तामिळनाडू
उत्तर :- कर्नाटक
👉प्रश्न सातवा- इ.स. १९११ मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली ?
1) जॉर्ज लाईट
2) एच जोन्स
3) लॉर्ड स्टोअर
4) लॉर्ड डर्बी
उत्तर :- जॉर्ज लाईट
👉प्रश्न आठवा- मानवी हृदयातील ठोक्यांचा आवाज ..... डेसिबल असतो?
1) 15 डिसेबल
2) 25 डेसिबल
3) 35 डेसिबल
4)70 डेसिबल
उत्तर :- 15 डिसेबल
👉प्रश्न नववा - अमृतानुभव हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
1) संत एकनाथ महाराज
2)संत तुकाराम महाराज
3)संत ज्ञानेश्वर महाराज
4)लोकमान्य टिळक
उत्तर :- श्री.संत ज्ञानेश्वर महाराज
👉प्रश्न दहावा- जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने कोणता उपक्रम सुरू केला आहे?
1) पर्यटन भारत
2) पर्यटन विकास
3) पर्यटन मित्र पर्यटन दीदी
4) शाश्वत विकास
उत्तर :- पर्यटन मित्र पर्यटन दीदी
👉प्रश्न अकरा- खालीलपैकी कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने 2024 मध्ये नुकतेच मलेरिया मुक्त घोषित केले आहे ?
1) इजिप्त
2) इराण
3) अमेरिका
4) दक्षिण कोरिया
उत्तर :- इजिप्त
👉प्रश्न बारा - अमेरिकेचे सध्याचे 2024 मध्ये 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
1) बराक ओबामा
2) कमला हॅरीस
3) डोनाल्ड ट्रम्प
4) यापैकी नाही
उत्तर :- डोनाल्ड ट्रम्प
👉प्रश्न तेरा - इ.स.१५५६ मध्ये भारतातील पहिले मुद्रणालय .....येथे सुरू झाले ?
1) कालिकत
2) हुगळी
3) सुरत
4) गोवा
उत्तर :- गोवा
👉प्रश्न चौदा- पंजाबचा राज्यपक्षी......आहे ?
1) हरियल
2) मोर
3) बाझ
4) कबूतर
उत्तर :- बाझ
👉प्रश्न पंधरा - "बळी तो कान पिळी" या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्त्व सुचविले आहे ?
1) तडजोड
2) शहाणपणा
3) वैभव
4) सामर्थ्य
उत्तर :- सामर्थ्य
👉प्रश्न सोळा- महाराष्ट्र राज्यत कोणत्या साली लोकायुक्त संस्थेची स्थापना करण्यात आली ?
1) 1927
2) 1972
3) 1970
4) 1975
उत्तर :-1972
👉प्रश्न सतरा- ..... हे भारतातील हिमालयातील सर्वोच्च पर्वत शिखर आहे ?
1) नंदादेवी
2) नामचा बरवा
3) कांचनजंगा
4) k2
उत्तर :- कांचनजंगा
👉प्रश्न अठरा- भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ कोण ?
1) विल्यम जोन्स
2) डॅनियल गोलमाल
3) पिटर सलोही
4) जॉन मेयर
उत्तर :- डॅनियल गोलमाल
👉प्रश्न एकोणीस - गरुड शक्ती युद्धसराव भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडतो आहे ?
1) इंडोनेशिया
2) अमेरिका
3) जपान
4) रशिया
उत्तर :- इंडोनेशिया
👉प्रश्न वीस- बातम्यांमध्ये असलेले कासव वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) गोरखपुर
2) प्रयागराज
3) वाराणसी
4) मेरठ
उत्तर :- वाराणसी
👉प्रश्न एकवीस- कोणत्या भारतीय टेबल टेनिसपटू ने डब्ल्यू टी टी फीडर कराकस 2024 मध्ये पुरुष एकेरी विजेतेपद पटकावले आहे?
1) हरमित देसाई
2) सम्यजीत घोष
3) शरद कमल
4) ज्ञान सेकरण
उत्तर :- हरमित देसाई
👉प्रश्न बावीस - अलीकडे कोणत्या राज्यात 50 विरोधी आमदारांचे शॅडो कॅबिनेट तयार करण्यात आले आहे?
1) महाराष्ट्र
2) मध्यप्रदेश
3) ओडिसा
4) उत्तर प्रदेश
उत्तर :- ओडिसा
👉प्रश्न तेवीस - शेती कारखानदारी वाहतूक नागरिकरण हे ......घटक आहेत?
1) आर्थिक
2) सामाजिक
3) राजकीय
4) प्राकृतिक
उत्तर :- आर्थिक
👉प्रश्न चैवीस- भारत व श्रीलंका दरम्यान ...... बेट आहे?
1) हल्दिया
2) लक्षदीप
3) अंदमान
4) पंबम
उत्तर :- पंबम
👉प्रश्न पंचवीस - बाल कुपोषणाशी संबंधित कार्य करणारी खालीलपैकी कोणती व्यक्ती आहे ?
1) डॉ अभय बंग
2) बाबा आमटे
3) बाबा आढाव
4)अण्णा हजारे
उत्तर :- डॉ अभय बंग
👉प्रश्न सव्वीस- पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर कोणते आहे?
1) कळसुबाई
2) अनईमुडी
3) गुरुशिखर
4) दोड्डा बेटा
उत्तर :- अनईमुडी
👉प्रश्न सत्तावीस- खालीलपैकी कोणता ई-मेल संदेशनाचा एक भाग आहे?
1) हेडर
2) मेसेज
3) ॲड्रेस
4) फुटर
उत्तर :- मेसेज
👉प्रश्न अत्तावीस- पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती आहे ?
1) एन सी आर बी
2) आर ए डब्ल्यू
3) बी पी आर व डी
4) डीआरडीओ
उत्तर :- बी.पी.आर. व डी.
👉प्रश्न एकोणतीस - ... हा वृक्ष विषुववृत्तीय वनात आढळतो?
1) चेस्टनट
2) साग
3) महोगणी
4) पाईन
उत्तर :- महोगणी
👉प्रश्न तीस- पोलिसांनी चोर पकडला (प्रयोग ओळखा)?
1) कर्तरी
2) कर्मणी
3) भावे
4) सकर्मक कर्तरी
उत्तर :- कर्मणी
👉प्रश्न एकतीस- कोणत्या संस्थेने २०२४ आशिया पॅसिफिल मानव विकास अहवाल जाहीर
केला आहे ?
1) WEF
2) ADB
3) AFIB
4) UNDP
उत्तर :-UNDP
👉प्रश्न बत्तीस - २०२४ चा मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार
कोणास मिळाला आहे ?
1) मनप्रीत सिंह
2) हुमायु भट
3) राम गोपाल नायडू
4) रवी कुमार
5) वरील सर्व
उत्तर :- कर्नल मनप्रीत सिंह
👉प्रश्न तेहतीस- जगातील पहिली सीएनजी स्कूटर कोणत्या कंपनीने सुरू केली आहे ?
1) महिंद्रा
2) टाटा
3) फियाट
4) बजाज
उत्तर :-बजाज पुणे फ्रीडम 125
👉प्रश्न चौतीस- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूकनायक या पाक्षीकाच्या शीर्षभागी कोणत्या महान संतांची वचने होती ?
1) संत नामदेव महाराज
2) संत एकनाथ महाराज
3) संत तुकाराम महाराज
4) संत ज्ञानेश्वर महाराज
उत्तर :- संत तुकाराम महाराज
👉प्रश्न पस्तीस - करी रोड (मुंबई) येथील रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय आहे ?
1) डोंगरी
2) मुंबादेवी
3) लालबाग
4) गिरगाव
उत्तर :-लालबाग
👉प्रश्न छत्तीस- रेशीम उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते आहे ?
1) कर्नाटक
2) केरळ
3) आसाम
4) पश्चिम बंगाल
उत्तर :- कर्नाटक
👉प्रश्न सदोतीस- १८ जुलै १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने कोणत्या कायद्याला मान्यता दिली ?
1) भारतीय फाळणीचा कायदा
2) भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
3) घटना मसुदा कायदा
4)घटना दुरूस्ती कायदा
उत्तर :-भारतीय स्वातंत्र्याचा कायदा
👉प्रश्न आठवतीस- वातावरणाच्या सर्वात खालच्या थरास काय म्हणतात ?
1) तपांबर
2) पितांबर
3) स्थितांबर
4) दलांबर
उत्तर :- तपांबर
(समुद्र सपाटीपासून सुमारे १० कि.मी. इंग्लिश मध्ये ट्रोपोस्फियर म्हणतात.)
👉प्रश्न एकोणचाळीस: माणसाच्या शरीरामधील सर्वात मोठा अवयव कोणता आहे ?
1) कान
2)नाक
3) त्वचा
4) जीभ
उत्तर :-त्वचा
👉प्रश्न चाळीस- वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट २०२४ कार्यक्रमाचे यजमान कोणते शहर आहे ?
1) पॅरिस
2) नवी दिल्ली
3) दुबई
4) लंडन
उत्तर :-लंडन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा